बंद

    गट कर्ज व्‍याज परतावा योजना

    • तारीख : 09/08/2023 -
    1. शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबविते
    2. बँकेकडून प्रती गटास कमीत कमी रु.१०.०० लक्ष ते जास्तीत जास्त रु. ५०.०० लक्षपर्यंतच्या मंजूर उद्योग उभारणीकरीता असेल.
    3. पात्र शेतकरी उत्पादक (शेतकरी उत्पादक संघटना, एफपीओ) गटांना रु.१०.०० लक्षपर्यंत बिनव्याजी दराने कर्ज रक्कम उद्योगाकरीता देण्यात येईल.
    4. योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून सदर प्रक्रीया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल.
    5. मंजूर कर्जावर ५ वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि रु. १५.०० लक्षच्या मर्यादेत त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.
    6. महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल.
    7. गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेबपोर्टल वर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल. प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रस्ताव पात्र ठरत असल्यास गटास संगणकीकृत सशर्त हेतुपत्र दिले जाईल. गटाने या आधारे बँकेकडून प्रकरणावर कर्ज मंजूर करुन घ्यावे लागेल.

    गट कर्ज व्‍याज परतावा योजना संकेतस्थळ:- http://mcvavm.vjnt.org/Main.aspx

    लाभार्थी:

    लाभार्थी हा महाराष्‍ट्र राज्‍यातील वडार व तत्सम जातीमधील असावा.

    फायदे:

    बॅंकेचे कर्ज मंजूर केलेल्‍या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्‍यास, जास्‍तीत जास्‍त १२% व्‍याज दराच्‍या आणि रु.१५.०० लक्षच्‍या मर्यादेत त्‍यातील व्‍याजाची रक्‍कम त्‍यांच्‍या आधार लिंक बॅंक खात्‍यात दरमहा महामंडळामार्फंत जमा करण्‍यात येईल.

    अर्ज कसा करावा

    सदर अर्ज महामंडळाच्या www.vjnt.org या संकेत स्थळावरून सादर करावा